Skip to main content

युगायुगापासून अबले


वेडे कुठे चाललीस, पुजाया वडसावित्री.
पती पत्नी शिवाय आहे आपली मैत्री.
शेवटी मी एक पुरुष आणि तू एक स्त्री.
कशाला देतेस समर्पणाची दरवर्षी खात्री.

वडसावित्रीच्या पूजेतून मुक्त करतो तुला.
जीवन साथी मी, मालक समजू नको मला.
माझे जीवन माझा हक्क, तसाच आहे तुझा.
खूप झाले हे बायकीपण , कर धमाल मजा.
माझे निर्णय घेतांना, मी विचारले कधी तुला.

प्रत्येक निर्णय घेताना ,तू विचारतेस का मला?
लग्न करताना घेतली होती बरोबरीची शपथ.
मग तुझ्या च वाट्याला का सावित्री चा पथ?

वडसावित्रीच्या दिवशी का करतेस उपवास.
बैठकीत मी ड्रीन्क घेतो, तोंडाला असतो वास.
दर्शन माझे घेतल्या शिवाय, तू घेत नाही घास.
खूप सोसलास त्रास, बंद कर उपासतापास.

स्त्री गुलाम ठेवण्याची, ही पुरूषांची रित आहे.
युगायुगापासून अबले, तू अशीच भीत आहे.
कर हिम्मत आता, मार लाथ नवरेपणाला.
मार माझ्यातला पती, भेटशील खऱ्या मित्राला.

Comments

Popular posts from this blog

मला धर्मापेक्षा माझी जात प्रिय आहे.

                           आजकाल जातीच्या-धर्माच्या नावावरुन एकमेकांशी भांडणारी माणसं पाहीली की मनामध्ये  सारखा एक प्रश्न येत राहतो की, 'माणसं आपल्या जातीवर जास्त प्रेम करतात की धर्मावर'?                 तेव्हा मात्र माझं मत असे आहे की, हा देश माझा आहे, ही जमीन माझी आहे, माझा जन्म या देशात झाला आहे, ज्या समाजात मी जन्मलो, वाढलो त्या समाजाविषयी मला तळमळ आहे. आज मी स्वतंत्र आहे, परंतु गेल्या ५००० वर्षांपासून अगदी काही वर्षापर्यंत तुमच्या धर्माने आमच्या समाजावर धर्माच्या नावाखाली जो काही अमानुष छळ करून भयंकर यातना दिल्या, त्या आम्ही सहजासहजी विसरणे कदापि शक्य नाही.  मी तुमच्या धर्मात जन्म घेतला असेल ही परंतु त्यात ही, मी माझ्या जातीत जन्म घेतला आहे. त्यामुळे येथून पुढे जर का तुमच्या धर्मावर संकट आले तर तुमचा धर्म वाचविण्यासाठी आम्ही येवू या भ्रमात तुम्ही राहू नये. एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, जेव्हा भेटणारी व्यक्ती परधर्मीय असेल तेव्हा मात्र आपल्यातील धर्म  ...

रानातला माणूस

तो फक्त सेवा करतोय इथल्या काळ्या मातीची, बाकी त्याला कशाचीही पर्वा नाही. माञ तो विधाता आहे त्याला साथ देण्यासाठी हरघडी त्याच्या सोबत. सांज वेळ होते आहे, पाखरे माघारी फिरत ...

सामाजिक परिवर्तनाची नांदी...!!!

                                    सध्या महाराष्ट्रात सगळीकडे मराठा समाजाचे मूकमोर्चे निघत आहेत. कोपर्डी येथील घडलेल्या पार्श्वभूमीवर सर्व मराठा समाज एकत्रित येवून मूकमोर्चे काढतो आहे. परंतु प्रश्न असा आहे की, मराठा क्रांती मोर्चा नव्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरेल का? मला याचे उत्तर नक्कीच होय असेच वाटते. ते कोणताही मोर्चा लाखोंच्या संख्येने निघाला म्हणून नाही किंवा या मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्र सरकार हादरले म्हणून सुद्धा नाही. तर जेव्हा जेव्हा एखाद्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण समाज एकसंघ,एकजूटपणे प्रतिकार करतो,उठाव करतो. तेव्हा तेव्हा समाजामध्ये खूप मोठे सामाजिक परिवर्तन घडले आहे, हा इतिहास आहे.                                       सन 1972 रोजी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ पाव शतक लोटले असताना या संबंध काळात एकीकडे दलितांवर अन्याय अत्याचार होत होते. तर दुसरीकडे या जुलमाला...