Skip to main content

Posts

मला धर्मापेक्षा माझी जात प्रिय आहे.

                           आजकाल जातीच्या-धर्माच्या नावावरुन एकमेकांशी भांडणारी माणसं पाहीली की मनामध्ये  सारखा एक प्रश्न येत राहतो की, 'माणसं आपल्या जातीवर जास्त प्रेम करतात की धर्मावर'?                 तेव्हा मात्र माझं मत असे आहे की, हा देश माझा आहे, ही जमीन माझी आहे, माझा जन्म या देशात झाला आहे, ज्या समाजात मी जन्मलो, वाढलो त्या समाजाविषयी मला तळमळ आहे. आज मी स्वतंत्र आहे, परंतु गेल्या ५००० वर्षांपासून अगदी काही वर्षापर्यंत तुमच्या धर्माने आमच्या समाजावर धर्माच्या नावाखाली जो काही अमानुष छळ करून भयंकर यातना दिल्या, त्या आम्ही सहजासहजी विसरणे कदापि शक्य नाही.  मी तुमच्या धर्मात जन्म घेतला असेल ही परंतु त्यात ही, मी माझ्या जातीत जन्म घेतला आहे. त्यामुळे येथून पुढे जर का तुमच्या धर्मावर संकट आले तर तुमचा धर्म वाचविण्यासाठी आम्ही येवू या भ्रमात तुम्ही राहू नये. एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, जेव्हा भेटणारी व्यक्ती परधर्मीय असेल तेव्हा मात्र आपल्यातील धर्म  ...
Recent posts

रानातला माणूस

तो फक्त सेवा करतोय इथल्या काळ्या मातीची, बाकी त्याला कशाचीही पर्वा नाही. माञ तो विधाता आहे त्याला साथ देण्यासाठी हरघडी त्याच्या सोबत. सांज वेळ होते आहे, पाखरे माघारी फिरत ...

तुम्ही नसता तर...

तुम्ही नसता तर समजलाच नसता मार्ग आम्हाला मुक्तीचा करत राहिलो असतो गुलामी, प्रथा-परंपरा रुढी-रिती पाळून वर्षानू वर्षे पण तुम्ही आलात आणि मार्ग दाखवला ज्ञानाचा दुर केला...

काळा दिवस नव्हे, संविधान सन्मान दिवस

दिडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामीत खितपत पडलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य व स्वाभिमानाचा अर्थ समजला तो संविधानामुळे, हे तेच भारतीय  संविधान आहे जे जगात सर्व...

आता लढायचं जातीसाठी....

कधी लढला मानासाठी पाया पडला पाण्यासाठी कधी रडला पोटासाठी राञभर झिजला लोकांसाठी नाही आली कोणाला दया आता थांबायच कशासाठी उठ होलारा उठ     आता लढायचं जातीसाठी उपाशी राह...

कुटुंब प्रमुख

मुले आणी बायको रात्री गाढ झोपुन जातात, अगदी निर्धास्तपणे,... कुठलीच काळजी नसते त्यांना, त्याचे ऐकमेव कारण म्हणजे घरातला कूटुंब प्रमुख, तो जाे पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत त्...

मास्तर तुम्हीसुद्धा...

नुकत्याच तालुकास्तरीय जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांच्या व्यक्तिमत्व विकास स्पर्धा पार पडल्या. लहान मुलांच्या अंगात असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा व मुलांना ...