Skip to main content

झुंडशाही मुर्ख असते


आजपर्यंतचा इतिहास असो किंवा सध्याची परिस्थिती झुंडशाही मुर्ख असते हे परत एकदा सिद्ध झाले.
जेव्हा कधी एखादा झुंड एखाद्यावर आक्रमण करतो त्यावेळी त्या झुंडाला फक्त एकच व्यक्ती जेव्हा प्रतिकार करते तेव्हा ती झुंड असुनही हारते आणि तो एकटा असुनही जिंकतो कारण झुंडशाही ही मुर्ख असते. तिला लढण्यासाठी कारण लागत नाही, ती परिणामाची पर्वा करत नाही. हेतू चांगला की वाईट याच्याशी त्यांना घेन देन नसते. झुंडशाही मधील लोकांची बुद्धी भ्रष्ट व मेंदू नासलेला असतो हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. म्हणून झुंडशाही मुर्ख असते.

माणसाला सत्तेचा आणि पैशाचा खुप माज असतो. किंबहुना पैसा किंवा सत्ता जर पिढीजात असेल तर माञ हा माज थोडा जास्तच असतो. ज्यांनी मोठ्या कष्टाने सत्ता व संपत्ती कमावलेली असते त्यांना त्याची किंमत असते मात्र बापजाद्यांची कर्तृत्वहिन व नालायक बेट्यांना त्याची किंमत कधीच कळत नाही.

जे फक्त एसीमध्ये बसून मजुरांना काम सांगतात, त्यांच्यावर आपला असा काही रोब झाडतात जणू काही हे सारे आपले गुलाम अन आपन माञ मोठे जहागीरदार आहोत. आपले कर्तृत्व शुन्य. आई बापाला शिव्या देवून स्वतःचे लग्न करून घ्यायचे. परत बापाच्या पेंशनवरतीच आपला संसार चालवायचा. लोक काय म्हणतील या भीतीने कुठेतरी टपरी टाकून बसायचे. (जे दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून टपरी टाकतात त्यांना सलाम, पण दिखाऊपणा करणाऱ्याच्या @#&*वर बांबूचे फटके दिले पाहिजेत.) थोड काही अंगावर आलं की लगेच मी शेतकरी म्हणून टाहो फोडणार्‍या ढेरपोट्या शेतकऱ्याला त्याची औकात दाखवायलाच हवी.

गावातील दिड-दिमडीचे पण प्रतिष्ठीत समजले जाणारे व संपत्तीचा दिखाऊपणा करणाऱ्या लोकांना झुकून मुजरे करणारे हुजरे गावात असतील तर गावाचे भविष्य काय असेल हे सांगायला पंडितांची गरज लागणार नाही.
गावचा विकास थांबण्यासाठी जेवढी सत्ता व संपत्ती कारणीभूत आहे त्याच बरोबर जातीभेद व जातीचा अभिमान ह्या गोष्टी सुद्धा कारणीभूत आहेत.

आपल्या जातीपेक्षा इतर जाती निच आहेत,अनं आपण माञ बामणाचे जावई असल्याच्या थाटात वावरतात ही विकृत मानसिकता आहे. महामानवाच्या जयंत्या मोठ्या थाटात साजऱ्या करणार्‍या या महाभागांना समोरच्या जातीतला माणूस सुद्धा माणूसच आहे एवढी क्षुल्लक गोष्ट सुद्धा कळू नये हे केवढे मोठे दुर्दैव आहे. आणि एवढी साधी गोष्ट कळत नसेल तर महामानवाच्या नावाने जातीचा उदो उदो करणे बंद करा.

माणसाला जगात सर्वात जास्त प्रिय आहेत आपले प्राण आणि प्राणापेक्षा जास्त प्रिय इज्जत. इज्जत तयार होते आपल्या आत्मसन्मानातुन. जेव्हा माणसाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचते तेव्हा तो सगळ्यात जास्त दुखी होतो. तो चवताळून उठतो आपला आत्मसन्मान वाचवण्यासाठी तेव्हा तो उच-निच पाहत नाही. तो कोलतो सार्‍या जगाला आपल्या #$&वरून.

म्हणून शेवटच सांगतो...
कुछ भी करने का,
 लेकिन अपना इगो हर्ट नही करनेका.

Comments

Popular posts from this blog

मला धर्मापेक्षा माझी जात प्रिय आहे.

                           आजकाल जातीच्या-धर्माच्या नावावरुन एकमेकांशी भांडणारी माणसं पाहीली की मनामध्ये  सारखा एक प्रश्न येत राहतो की, 'माणसं आपल्या जातीवर जास्त प्रेम करतात की धर्मावर'?                 तेव्हा मात्र माझं मत असे आहे की, हा देश माझा आहे, ही जमीन माझी आहे, माझा जन्म या देशात झाला आहे, ज्या समाजात मी जन्मलो, वाढलो त्या समाजाविषयी मला तळमळ आहे. आज मी स्वतंत्र आहे, परंतु गेल्या ५००० वर्षांपासून अगदी काही वर्षापर्यंत तुमच्या धर्माने आमच्या समाजावर धर्माच्या नावाखाली जो काही अमानुष छळ करून भयंकर यातना दिल्या, त्या आम्ही सहजासहजी विसरणे कदापि शक्य नाही.  मी तुमच्या धर्मात जन्म घेतला असेल ही परंतु त्यात ही, मी माझ्या जातीत जन्म घेतला आहे. त्यामुळे येथून पुढे जर का तुमच्या धर्मावर संकट आले तर तुमचा धर्म वाचविण्यासाठी आम्ही येवू या भ्रमात तुम्ही राहू नये. एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, जेव्हा भेटणारी व्यक्ती परधर्मीय असेल तेव्हा मात्र आपल्यातील धर्म  ...

रानातला माणूस

तो फक्त सेवा करतोय इथल्या काळ्या मातीची, बाकी त्याला कशाचीही पर्वा नाही. माञ तो विधाता आहे त्याला साथ देण्यासाठी हरघडी त्याच्या सोबत. सांज वेळ होते आहे, पाखरे माघारी फिरत ...

सामाजिक परिवर्तनाची नांदी...!!!

                                    सध्या महाराष्ट्रात सगळीकडे मराठा समाजाचे मूकमोर्चे निघत आहेत. कोपर्डी येथील घडलेल्या पार्श्वभूमीवर सर्व मराठा समाज एकत्रित येवून मूकमोर्चे काढतो आहे. परंतु प्रश्न असा आहे की, मराठा क्रांती मोर्चा नव्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरेल का? मला याचे उत्तर नक्कीच होय असेच वाटते. ते कोणताही मोर्चा लाखोंच्या संख्येने निघाला म्हणून नाही किंवा या मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्र सरकार हादरले म्हणून सुद्धा नाही. तर जेव्हा जेव्हा एखाद्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण समाज एकसंघ,एकजूटपणे प्रतिकार करतो,उठाव करतो. तेव्हा तेव्हा समाजामध्ये खूप मोठे सामाजिक परिवर्तन घडले आहे, हा इतिहास आहे.                                       सन 1972 रोजी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ पाव शतक लोटले असताना या संबंध काळात एकीकडे दलितांवर अन्याय अत्याचार होत होते. तर दुसरीकडे या जुलमाला...