दिडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामीत खितपत पडलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य व स्वाभिमानाचा अर्थ समजला तो संविधानामुळे, हे तेच भारतीय संविधान आहे जे जगात सर्वोत्तम आहे. आज या संविधानामुळेच भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. होय लोकशाही कारण इथे लोकांची सत्ता असते. हा देश कोणी चालवायचा, आपले प्रतिनिधित्व कोणी करायचे हे सर्व लोक ठरवतात. म्हणून दर पाच वर्षांनी हे लोक नेते आपण केलेल्या कामाची यादी घेवून मत मागायला शेवटी आपल्याकडे येतात. तो सर्वसामान्य नागरिक ठरवतो इथल्या व्यवस्थेचा राजा.
हे सर्व शक्य झाले ते फक्त भारतीय संविधानामुळेच.
म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस *भारतीय संविधान दिवस* म्हणून आपण साजरा करायला हवा.
26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात आपल्या जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य बजावताना जे वीर जवान शहिद झाले त्यांना विनम्र अभिवादन. हा देश माझा आहे आणि या देशासाठी माझे प्राण गेले तरी बेहत्तर, हि शिकवण मिळते ती फक्त याच महाराष्ट्राच्या मातीतुन आणि भारतीय संविधानातुन. ज्या वीर जवानांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले त्यांचा स्मृतीदिन *काळा दिवस* म्हणून पाळण्यापेक्षा त्यांच्या राष्ट्रभावनेचा आदर करून हा दिवस *भारतीय संविधान दिवस* म्हणून साजरा करावा हि विनंती.
बाकी मुंबई वरती झालेला भ्याड हल्ला आम्ही कदापी विसरणार नाही,
सुन ले पाकिस्तान...
मौका सभी को मिलता है
बारी तेरी भी आयेगी...
Comments
Post a Comment