तुम्ही नसता तर समजलाच नसता मार्ग आम्हाला मुक्तीचा
करत राहिलो असतो गुलामी, प्रथा-परंपरा रुढी-रिती पाळून वर्षानू वर्षे
पण तुम्ही आलात आणि मार्ग दाखवला ज्ञानाचा
दुर केलात अंधार अडाणीपणाचा
आयुष्यभर गुलामी करून
मिटलेल्या हातावरच्या रेषा
तुम्हीच शिकवल्या वाचायला
रेषेला रेष मिळूनच तर
तयार होत भविष्य
समजू लागलय आता
किती सैन्य होत तुमच्याकडे?
का राजा होतात तुम्ही ?
पण तरीही जिंकलात तुम्ही
क्रांती केलीच...
कदाचित तुम्ही पाहीली नसेल
पण आम्ही माञ आमचा 'छञपती' पाहिला तुमच्यात
म्हणूनच तुम्हाला 'क्रांतीसूर्य' म्हणत असतील
किती भाग्यवान आहात तुम्ही
गुरू म्हणून छञपती आणि
शिष्य म्हणून बाबासाहेब लाभले
तुमचा हेवा वाटावा एवढे मोठे भाग्य
.
.
.
.राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
Comments
Post a Comment